Raj Thackeray VS Uddhav Thackray : १२ वर्षापूर्वी न दिलेली टाळी आता का दिली गेली?
10-Jan-2026
Total Views |
मुंबई : ( Raj Thackeray and Uddhav Thackeray ) एप्रिल २०१४ साली लोकसभा निवडणूकीदरम्यान डोंबिवली येथे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासाठीच्या जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला होता.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की," बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.पण मग उद्धव ठाकरेंच्या ऑपरेशन वेळी मी दवाखान्यात दिवसभर बसून होतो.दवाखान्यातून मातोश्रीपर्यंत उद्धव ठाकरेंना घेऊन जाताना त्यांना वाटलं नाही मी पाठीत खंजीर खुपसला."
"माननीय बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात असताना रोज ते मला फोन करून बोलवून घ्यायचे. एकदिवस मी त्यांच्याजवळ बसलो होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे थकले होते,आजारी होते आणि त्यांच्यासमोर दोन छोटे बटाटे वडे आले होते.मी तेव्हा त्यांना असले तेलकट वडे का खाताय असे विचारले होते. तर माझ्या समोर येतच ते मी काय करणार याला असे उत्तर त्यांनी मला दिले.मी तेव्हा त्यांना चिकन सूप सुरु केले होते ते सूप शेवटपर्यंत साहेब घ्यायचे.त्यांना कधी नाही वाटलं मी पाठीत खंजीर खुपसला पण उद्धव ठाकरेंना वाटलं." अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी प्रत्युतरादाखल दिली होती.
" पक्षातील टोळक्यांच्या नादानपनामुळेच मी पक्षातून बाहेर पडलो.आणि हे मला सांगतात पाठीत खंजीर खुपसला. भाजपाचे नेते मला भेटायला येतात तेव्हा सामनातून अग्रलेख लिहून माझे वाभाडे काढले जातात."असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून आणि एकमेकांना टाळी देण्यावरून त्यावेळी माध्यमात खूप चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात तेव्हा राज्यातील विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा आणि काँग्रेस,राष्ट्रवादीवर टीका करण्यापेक्षा ठाकरे बंधू आपापसात टीका करण्यातच धन्यता मानत होते.
मात्र याच्या उलट परिस्थिती असून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत पण आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत अशी जाहीर संबोधने ते करीत आहेत.मग प्रश्न हा येतो की वेगळे झाले होते तेव्हा मराठी माणसाची काळजी न्हवती का ? आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरच ठाकरे बंधू विभक्त झाले तेव्हा त्यांना काय वाटल असेल.या सर्वांचा विसर पडलेला असेल तरी इतिहासात या गोष्टीची नोंद झालेली आहे याचे काय.आता सुद्धा विकासाचे मुद्दे बाजूला सोडून ठाकरे बंधू मराठी माणूस या एकाच मुद्यावर बोलताना दिसत आहेत फक्त तेव्हा वेगळी वाट धरून हे बोलले जात होते आणि आता एकत्र येऊन यावर बोलले जात आहे.पण मराठी माणसाचे प्रश्न अन विकासाची ब्ल्यू प्रिंट यावर मात्र ते अजून गप्पच आहेत.