रश्मी शुक्लांनी जे खरं ते मांडल असेल - चंद्रशेखर बावनकुळे
10-Jan-2026
Total Views |
मुंबई :( Chandrashekhar Bawankule ) "रश्मी शुक्लांनी जे खरं आहे ते मांडल असेल.जी गोष्ट रेकॉर्डवर आहे ती त्यांनी मांडली असेल.काही गोष्टी खऱ्या असतात त्या सत्याच्या आधारावरच अधिकाऱ्यांनी टिप्पणी केली असेल." अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार दि.१० रोजी माध्यमांशी बोलताना दिली.
"संजय पांडे कुणाच्या आदेशाने काम करीत होता आणि त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे.संजय पांडेची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे.ज्यामुळे पांडेच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण हे सुद्धा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्तानच्या समोर येणं आवश्यक आहे." असे मत भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केले.
"रश्मी शुक्लांनी जो अहवाल दिला आहे त्यावर संजय राऊत यांनी भाष्य करणे चुकीचे आहे.कारण मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने दिलेला तो अहवाल आहे. संजय राऊत आज त्यांना आर एस एस चे कार्यकर्ता म्हणतील उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील.अशी विधान करून उगाच चर्चा दुसरीकडे भरकटवणे हा संजय राऊत यांचा धंदा आहे." अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर दिली.
"भाषणात कधी कधी जी व्यक्ती बोलते त्याचा अर्थ, अनर्थ बेआर्थ लावला जातो. त्यांच्या म्हणायचा रोख काय होता ते एकदा बघावं लागेल. मगच त्यावर टिप्पणी करावी लागेल. " अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार दि.१० रोजी माध्यमांशी बोलताना तामिळनाडूचे भाजप नेते के अण्णामलाई यांच्या मुंबईबाबतच्या विधानावर दिली.