Bangladesh Violence : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; दोन आठवड्यांत चौथा हल्ला

    01-Jan-2026   
Total Views |

Bangladesh Violence

ढाका : (Bangladesh Violence
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने हत्या केल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा एका हिंदू व्यक्तीवर हल्ला झाल्याचे समोर आले. शरीयतपूर परिसरात खोकन चंद्रा नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याला जमावाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.(Bangladesh Violence)

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री खोकन चंद्र दास या ४० वर्षीय व्यापाऱ्यावर जमावाने हल्ला केला. कानेश्वर युनियनमधील केउरभंगा परिसरात फार्मसी चालवणारे खोकन चंद्र दास घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. बुधवारी संध्याकाळी दुकान बंद करून घरी परतत असताना तिलोई परिसरात एका हिंसक जमावाने त्यांना अडवले.(Bangladesh Violence)

जमावाने आधी त्यांना बेदम मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केले.एवढ्यावर न थांबता, त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र खोकन यांनी जवळच्या तलावात उडी मारल्यामुळे ते थोडक्यात बचावले. मात्र या घटनेत ते गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्तानुसार, हा हल्ला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडला.(Bangladesh Violence)

दोन आठवड्यात चौथा हल्ला
  • १८ डिसेंबर - दीपू चंद्रा दास
  • २४ डिसेंबर - अमृत मंडल ऊर्फ सम्राट
  • ३० डिसेंबर - बजेंद्र बिस्वास
  • ३१ डिसेंबर - खोकन चंद्र दास



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\