मॉस्को : (Russia Announces New mRNA-based Cancer Vaccine) जगभरातील कॅन्सररूग्णांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर लस तयार केली असल्याचा दावा केला आहे. या लसीच्या तीन प्री-क्लिनिकल चाचण्या घेण्यात आहेत. लस तयार असून अधिकृत मंजुरीची प्रतिक्षा करत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
एफएमबीए प्रमुख वेरॉनिका स्क्वोर्त्सोवा यांनी सांगितले की, "रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सिन आता रुग्णांवर वापरासाठी तयार आहे. mRNA-बेस्ड या व्हॅक्सिनमध्ये सर्व प्रकारच्या प्री-क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पार केले आहे. त्यामुळे ही लस सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाल्याचे म्हटले जात आहे. या लसीचे प्रारंभिक लक्ष्य कोलोरेक्टल कॅन्सर ( कोलन कॅन्सर ) असेल."
रशियाच्या वृत्त संस्था TASS च्या बातमीनुसार, रशियाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीने चाचण्यात चांगली कामगिरी केली आहे. एफएमबीए च्या प्रमुख वरोनिका स्क्वोर्त्सोवा यांनी इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये याची घोषणा केली आहे. स्कवोर्त्सोवा यांनी सांगितले की, "गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरवरील हे संशोधन चालले होते. ज्यात गेल्या तीन वर्षांत केवळ मँडेटरी प्री-क्लीनिकल स्टडीजलाच समर्पित होते. व्हॅक्सिन आता वापरासाठी तयार होते. आम्ही आता केवळ अधिकृत मंजुरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहोत.
आतापर्यंत प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीच्या सुरक्षेवर तसेच वारंवार वापरानंतरही तिच्या प्रभावशीलतेला दुजोरा दिलेला आहे. संशोधकांनी या दरम्यान ट्युमरचा आकार कमी आणि ट्युमरचा विकास खुंटल्याचे पाहायला मिळाले आहे", असे स्कवोर्त्सोवा यांनी सांगितले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\