उपमुख्यमंत्र्यांशी वाद, व्हायरल फोनकॉल; कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा?

    05-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (IPS Officer Anjana Krishna) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरमधील कुर्डू गावातील कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून सुरु असलेली कारवाई थांबवण्याचा तोंडी आदेश देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला. यानिमित्ताने विरोधकांकडून अजित पवारांवर टीका होत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये आयपीएस अंजना कृष्णा हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा?

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही. एस. आहे. सध्या त्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्या पंढरपूरमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी होत्या. करमाळा हे अंजना कृष्णा यांचे पहिले स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे. अंजना कृष्णा यांनी २०२२- २३ मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षेत भारतातून ३५५ वी क्रमांक पटकावला. 

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना कृष्णा यांनी प्राथमिक शिक्षण पुजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून घेतले. त्यांचे उच्च शिक्षण तिरुवनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमन (नीरमंकारा) येथे झाले. त्यांनी केरळ विद्यापीठातून सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी केली आणि त्यामध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\