नाटक, कथ्थक, जर्मन भाषा ते PHD, स्वप्नील राजशेखर यांच्या लेकीला पाहिलंय? आहे सर्वगुणसंपन्न

    05-Sep-2025
Total Views |


मुंबई: मराठी सिनेविश्वातल्या स्टारकिड्सची नेहमीच चर्चा होताना दिसते. कोणी सिनेविश्वातच आईबाबांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आपल्या करियरला सुरुवात केली तर कोणी वेगळी वाट निवडली. त्यातीलच एक म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची कन्या. कृष्णा असं त्यांच्या लेकीचं नाव आहे. नुकतंच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर पुढील शिक्षणाची तयारी ती करतेय. या शिवाय नुकतीच तिने राज्यस्तरीय परिक्षा दिली असून त्यातही ती अव्वल आल्याचं स्वतः स्वप्नील यांनी सांगितलं आहे.

कृष्णा फक्त आभ्यासातच नाही तर कलागुणांनीही संपन्न आहे. ती कथ्थक विशारद आहे तसेच नाटाकांमध्येही काम करते. आपल्या लेकीसाठी स्वप्नील यांनी खास पोस्ट लिहिली आहे. ज्यात ते म्हणतात,



स्वप्नील यांची पोस्ट जशीच्या तशी,


“मैत्र हो, सुह्रद हो….
एक आनंदवार्ता..

माझी कन्या कृष्णा (krushna rajshekhar) ही ईंग्रजी विषयात UGC NET आणि SET या अनुक्रमे राष्ट्रीय व राज्यस्तरीय दोन्ही कठीण परिक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली…

दोन नाटकांचे प्रयोग, ऑडियो ईंडस्ट्रीमधले प्रोजेक्टस, सोशल मिडीया प्रमोशन्स, अभिनय क्षेत्रातील उमेदवारी आणि बापाची फुल टाईम ॲटेंडंट ह्या सगळ्या जबाबदाऱ्या नीटस सांभाळून….
बरं, कथक विशारद आहे, जर्मन भाषेचा अभ्यास सुरु आहेच.. जर्मनीत जाऊनही शिकलीय…

आता phD साठी प्रवेश घेतला आहे…

आपली पोर हुशार आणि सिन्सीअर असणं हे बापासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी आहे…

पण तरी मी पोरीला सल्ला दिला, म्हटलं
“दमानं गं… पणजोबा, आजोबा, बाप… सगळ्यांच्या वाट्याचं तु एकटीच शिकतेयस का काय ?!!!”

तशी हुशारी, कलागुण पुर्वापार आमच्यात आहेत… पण चिकाटी, सिन्सिॲरीटी, ध्येयासक्ती तिच्या आजी आणि आईकडुन तिच्यात आलीय…
आणि ‘स्त्री’ असल्याने पोर जन्मजात अष्टावधानी, जबाबदार, सक्षम आहेच..
असं सगळं…

तर असं घराव लायटींग….
☺️🎉💐”


तर लेकीच्या यशाने स्वप्नील यांना प्रचंड आनंद झाला असून ‘तर असं घराव लायटींग’ असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे. कृष्णा शास्त्रीय नृत्यासह नाटकांमध्येही काम करताना दिसते.