अजित पवारांनी अखेर मौन सोडलं; महिला आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या वादावर दिलं स्पष्टीकरण

    05-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (DCM Ajit Pawar Reaction on Viral Video of IPS Anjana Krishna) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावातील कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून सुरु असलेली कारवाई थांबवण्याचा आदेश देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विरोधकांकडून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.

सुरुवातीला अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करणे टाळले. मात्र, राष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर आता अजित पवार यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपला उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणची परिस्थिती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता, अशी प्रतिक्रिया 'एक्स'वरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली


अजित पवारांची पोस्ट

अजित पवार यांनी म्हटलं, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे."




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\