भूतानचे पंतप्रधान टोबगे श्रीरामललाच्या चरणी लीन

    05-Sep-2025   
Total Views |

अयोध्या : भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग टोबगे यांनी शुक्रवारी अयोध्या येथे श्रीरामललांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीराम दरबाराचे दर्शन घेतले तसेच कुबेरटीला येथे भगवान शिवाचा जलाभिषेक व आरतीही केली. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे महासचिव चंपत राय यांनी इतर न्यासियांसह टोबगे आणि त्यांच्या धर्मपत्नी यांचे मंदिर प्रांगणात आत्मीय व आदरपूर्वक स्वागत केले. दर्शनादरम्यान, न्यासियांनी मंदिर प्रांगण, त्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व आणि सुरू असलेल्या बांधकाम कार्याबाबत सविस्तर माहिती दिली, ज्यामुळे टोबगे यांना मंदिराच्या समग्र स्वरूपाची सखोल जाण झाली.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक