शिखर धवनला ईडीचे समन्स! मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी; नेमकं प्रकरण काय?

    04-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (Shikhar Dhawan Summoned by ED) भारताचा माजी फलंदाज शिखर धवनला ईडीने एका ऑनलाइन बेटिंग ॲप जाहिरातीशी संबंधित प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी गुरुवारी ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता तो ईडी कार्यालयात हजर होता. ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकीची शक्यता तपासण्यासाठी ईडीने हे पाऊल उचलले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही चौकशी 1xBet नावाच्या 'बेकायदेशीर' ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे, ज्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले होते. या चौकशीचा भाग म्हणून संघीय तपास संस्था मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) शिखर धवनचा जबाब नोंदवला आहे.

शिखर धवन काही जाहिरातींद्वारे या अॅपशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे चौकशीदरम्यान ईडीला त्याचे या अॅपशी असलेला संबंध जाणून घ्यायचा आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर बेटिंग ऑप्सला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे. ईडीने याबाबतची त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.






अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\