मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? आणि कोणत्या प्रलंबित?

    03-Sep-2025   
Total Views |

मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य?

१) हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी

२) मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी

३) मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे

४) प्रलंबित जात पडताळणीला मान्यता

५) निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस मुदतवाढ

६) ५८ लाख कुणबी नोंदी सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणार

कोणत्या मागण्या प्रलंबित?

१) सातारा आणि औंध संस्थानच्या गॅझेटमध्ये कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी १ महिन्याची मुदत

२) मराठा आणि कुणबी एकच आहे, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. परंतू ही प्रक्रिया किचकट असून यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

३) सगेसोयऱ्यांसंबंधी ८ लाख हरकती आल्या असून त्यांच्या छाननीसाठी वेळ लागणार आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....