टिटवाळा मांड्यातील इमारतीवर मोबाईल टॉवरला ग्रामस्थांचा विरोध ; केडीएमसीची संबंधित बिल्डरला काम बंद करण्याची नोटीस

    03-Sep-2025   
Total Views |

कल्याण , कल्याण जवळील टिटवाळा मांडा परिसरात एका इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या मोबाईल टॉवरला टिटवाळा मांडा ग्रामस्थांनी कडून विरोध केला आहे. याबाबत मांडा टिटवाळा ग्रामस्थांनी टिटवाळा पोलीस स्टेशन सह कल्याण डोंबिवली महापालिकेला तक्रार केली आहे. संबंधित टॉवर उभारल्यास परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

सदर इमारतीच्या आजूबाजूला अनेक घरे आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, रुग्ण राहतात . मांडा परिसरात मोबाईल टॉवर असताना काही पैशांसाठी आणखी एक टॉवर का उभारला जातोय असं संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. केडीएमसीने तत्काळ या टॉवरचे काम थांबवावे हा मोबाईल टॉवर काढून टाकावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .तर याबाबत केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी ग्रामस्थांनी विरोध केल्याने संबंधित विकासाला या टॉवरचे काम बंद करण्याची नोटिस देण्यात आल्याचे सांगितले.