मुंबई उच्च न्यायालयात नव्या १४ न्यायमूर्तींची नियुक्ती

    03-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (Bombay High Court gets 14 new Judges) मुंबई उच्च न्यायालयाला आणखी १४ नवे न्यायमूर्ती मिळाले आहेत. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत या चौदाही न्यायमूर्तींचा मंगळवारी दि. २ सप्टेंबर रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदाचा शपथविधी पार पडला.

उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी अतिरिक्त न्यायमूर्तीपदाची शपथ दिली. या चौदाही न्यायमूर्तींची वकील वर्गातून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती.

न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेल्यांमध्ये सिद्धेश्वर ठोंबरे, मेहरोज खान पठाण, रणजितसिंह भोसले, संदेश पाटील, श्रीराम शिरसाट, हितेन वेणेगावकर, रजनीश व्यास, राज वाकोडे, नंदेश देशपांडे, अमित जामसांडेकर, आशिष चव्हाण, वैशाली पाटील जाधव, आबाश्वब शिंदे आणि फरहान दुभाष यांचा समावेश आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\