सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी १० कोटींची मदत

    29-Sep-2025   
Total Views |

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेक जिल्हांतील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास'तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'सिद्धिविनायक मंदिर न्यास'चे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती दिली.


आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, "महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि पूराचे मोठे संकट आले आहे. हजारों शेतकऱ्यांची पीके वाहून गेली, घरे उध्वस्त झाली आणि कुटुंबांचे जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तातडीने १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....