मुंबई मेट्रो मार्ग ३ - हुतात्मा चौक स्थानक ; विना छताच्या (ओपन-टू-एअर) प्रवेश/निर्गमन द्वारा संदर्भातील स्पष्टीकरण

Total Views |


मुंबई, हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाचे डिझाइन डी. एन. रोडवरील वारसा हक्क इमारती परिसर- फ्लोरा फाऊंटन तसेच हुतात्मा चौक स्मारकासारख्या महत्त्वपूर्ण वास्तूंचे सौंदर्य संवर्धनाचे महत्व लक्षात घेवून काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक परिसराचे दृश्य व वास्तुकलात्मक स्वरूप जतन करण्यासाठी, लिफ्ट शाफ्ट आणि काही वायुवीजनाच्या (tunnel Ventilation) रचनांव्यतिरिक्त इतर सर्व स्थानकाच्या सुविधा जमिनीखाली बांधण्यात आल्या आहेत. प्रवेश/निकास मार्ग खुले ठेवले असून, दगड व काच वापरून तयार केले गेले आहेत, परिसराशी सुसंगत दिसतील अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणतेही शेड्स (कॅनोपीज) लावलेले नाहीत, जगातील वारसा हक्क इमारती असलेल्या परिसरात अशाप्रकारे प्रवेश / निकास द्वारांची रचना करण्यात येते.

येथील एस्कलेटर पूर्णपणे बाहेरील वापरासाठी सक्षम आहेत. या स्थानकात पावसाच्या पाण्याचा निचरा आणि पूरप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध असून प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली आहे. या डिझाइनची वारसाहक्क वास्तुशास्त्रज्ञांशी सल्ला मसलत करुन मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी (MHCC) कडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) यास प्राप्त झाले आहे.

नागरीकांना आम्ही विश्वास देतो की हे वारसा इमारतीच्या सौंदर्याचे जतन करण्यासाठी डिझाइन जाणीवपूर्वक तयार करण्यात आले असून यामुळे ऐतिहासिक परिसराच्या शहरी सौंदर्यात भर पडणार आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.