नागपूर : कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार १ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव आयोजित करण्यातआले आहे. यावेळी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६९ मीटर लांबीचा पंचशील ध्वजासह शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुध्द व भीम गीतांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम , पुज्य भिक्षूसंघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुध्द वंदना होणार आहे. अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख अॅड. सुलेखा कुंभारे यांनी दिली आहे.
या महोत्सवामध्ये भारतीय संविधानाच्या जगातील सर्वात मोठ्या आकाराची प्रतिकृती निमिंती संकल्पाचे प्रसारण होईल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थीत राहणार आहेत. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या जीवन प्रवास मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. तर या महोत्सवामध्येरामदास आठवले यांच्या हस्ते त्यांच्या खासदार निधीतून ओगावा सोसायटीला प्राप्त झालेल्या ग्रीन एसी बसचे लोकार्पण होणार आहे.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.