मुंबई, शाश्वततेच्या दिशेने पुढाकार घेत टाटा पॉवरने नुकतेच मुंबईतील देवनार येथे दत्ताराम पाटील, जी गार्डन येथे वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, टाटा पॉवरचे प्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम, स्थानिक स्वयंसेवी संस्था, तसेच कर्मचारी व स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.
आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात निसर्गभ्रमण व ध्यानधारणेच्या सत्राने झाली. त्यानंतर स्थानिक जैवविविधतेला चालना मिळावी, परिसरातील हिरवाई वाढावी आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी विविध देशी वृक्ष प्रजातींचे एकूण १५० रोपे लावण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरणीय शाश्वतता, शहरी हिरवाई आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक जबाबदारी अधोरेखित झाली असून, निरोगी भविष्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.