मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून राज्यव्यापी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान' राबवले जात आहे हे बघून मला आनंद झाला. या मोहिमेमुळे केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे कौतुकास्पद आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या महसूल विभागाचे कौतूक केले.
पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात एक पत्रही लिहिले आहे. "महाराष्ट्राच्या प्रगतीत महसूल विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन, पारदर्शक सेवा वितरण, शेतकरी आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि विकास योजनांची सुरळीत अंमलबजावणी करण्यात विभागाचे योगदान कौतुकास्पद आहे. आज विविध सेवा नागरिकांपर्यंत त्यांच्या दाराशी पोहोचत आहेत आणि सरकारवरील विश्वास बळकट झाला आहे," असे ते म्हणाले.
विकसित भारताच्या संकल्पात अभियानाची महत्वाची भूमिका
"देशाची कर प्रणाली सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी जीएसटी दरांमध्ये बदल केल्याने केवळ दैनंदिन गरजांवरील घरगुती खर्च कमी झाला नाही तर लहान आणि मोठ्या व्यवसायांना त्यांचे व्यवसाय वाढवणेदेखील सोपे झाले आहे. गेल्या अकरा वर्षांपासून, आम्ही आमच्या विविध धोरणे आणि योजनांद्वारे आमच्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. स्वदेशीचा मंत्र स्वीकारून, आपल्या विविध संस्था आणि संघटना भव्य आणि विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आपले सामूहिक प्रयत्न राष्ट्राला स्वावलंबी आणि सक्षम बनवतील, प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जातील. मला विश्वास आहे की 'छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान' सक्षम नागरिक, सक्षम महाराष्ट्र आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात म्हटले.
"जनभावना ओळखणारे आपले हे प्रखर राष्ट्राभिमानी शब्द आमच्यासाठी प्रोत्साहन देणारे तर आहेतच, पण जनतेची कामे करण्यासाठी हा शब्दरूपी आशीर्वाद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मी आपला आभारी आहे. आपण व्यस्ततेतून या अभियानाला शुभेच्छा, प्रेरणा आणि विलक्षण बळ देणारे पत्र लिहून आम्हाला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र लोकाभिमुख कामासाठी अग्रेसर आहे ही जाणीव या पत्रातून यातून निर्माण झाली. अभियानातील जनतेची सकारात्मकता, सहभाग हा उपक्रम असाच निरंतर राहील, याचे निदर्शक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेले हे अभियान लोकचळवळ ठरेल, असा विश्वास मला आहे. आपल्या शुभकामना मला नेहमीच जनसामान्यांची कामे करण्यासाठी बळ देतात." - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....