मुंबई, 'कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे नुकतेच राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले असून ठाण्यातील युवा कवी गीतेश शिंदे यांना 'कविवर्य आरती प्रभू स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२३-२४ या वर्षासाठी गीतेश यांच्या बहुचर्चित 'सीसीटीव्हींच्या गर्द छायेत' या कवितासंग्रहासाठी हा सन्मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पाच हजार रुपये रोख असे आहे.
'सीसीटीव्हींच्या गर्द छायेत' या कवितासंग्रहाची तृतीय आवृती प्रकाशित झाली असून त्यास आजवर प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांचा 'यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर तसेच मसाप, दामाजीनगर यांचा सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार. काव्यरसिक मंडळ, डोंबिवली यांचा 'कै. अनिल साठ्ये स्मृती पुरस्कार, मराठी वाङमय परिषद, बडोदे यांचा सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे यांचा 'श्रीस्थानक' राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार, अक्षरबंध प्रतिष्ठान, नाशिक यांच्या अक्षरबंध सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव यांचा कविवर्य कृ. ब. निकुंब काव्य पुरस्कार, विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन, वेंगुर्ला येथील 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' राज्यस्तरीय पुरस्कार, चांदवडी रुपय्या युवा वाङमय पुरस्कार अशा काही महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.