मुंबई : नारा (कारंजा घाटगे) येथील संत सखुमाता यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट नागपूरच्या महल स्थित कार्यालय येथे झाली. ३० वर्षांनंतर प्रथमच संत सखुमाता नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिराबाहेर पडल्या आणि सरसंघचालकांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान संत सखुमाता यांनी इच्छा व्यक्त केली की संत सखुमाता देवस्थान, नारा येथील परिसराचा उपयोग जनकल्याणासाठी व्हावा आणि सरसंघचालकांनी हा परिसर जनतेला समर्पित करावा. मंदिरातील कार्यकर्त्यांनी परिसरात वर्षभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची, उपक्रमांची आणि लोकउत्सवांची माहिती दिली. या प्रसंगी, अतुल घनोटे यांनी सद्भाव विभागाचा परिचय करून दिला. त्यानंतर सद्भाव उपक्रमाच्या सदस्यांनी आपला परिचय दिला आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची माहिती सरसंघचालकांसमोर मांडली.