तुमचे आणि पाक प्रेमींचे नाते काय? मंत्री आशिष शेलार यांचा उबाठा गटाला सवाल

    20-Sep-2025   
Total Views |

मुंबई : तुमचे आणि पाक प्रेमींचे नाते काय? असा सवाल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शनिवार, २० सप्टेंबर रोजी उबाठा गटासह विरोधकांना केला आहे.

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "राहुल गांधी यांचे राजकीय सल्लागार सॅम हे पाकिस्तानला गेल्यावर मला घरच्यासारखे वाटते, असे म्हणतात. तर जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासिन मलिक प्रतिज्ञापत्रात सांगतोय की, 'माझ्या पाकिस्तान दौऱ्यात मी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदला भेटलो होतो, या भेटीसाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माझे आभार मानले होते."

"ज्या काँग्रेसला पाकिस्तान घरच्या सारखे वाटते, त्याच काँग्रेसच्या घरात सध्या उद्धव ठाकरे आणि विश्वविख्यात प्रवक्ते विसावले आहात ना? मग, आता कसे वाटतेय? हिरवे हिरवे, गारगार? की, नेहमी प्रमाणे टांगा पलटी घोडा फरार? मुंबईकरांचा आरोपी मुसा बरोबरचे संबंध उघड झाले होतेच. आता मुंबईकरांना सांगा तुमचे आणि पाक प्रेमींचे नाते काय? नाहीतर मुंबईकरांचे धरा पाय," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....