बंदर विभागातील अधिकाऱ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम : पहिल्या इंडक्शन प्रोग्रामचे जेएनपीएने भूषवले यजमानपद

Total Views |

मुंबई, भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) ने भारतीय बंदर संघटनेच्या सहकार्याने सर्व प्रमुख बंदरांचे अधिकारी यांचे पहिले इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख बंदरांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. हा उपक्रम जेएनपीएच्या भारतीय बंदर क्षेत्रातील क्षमता विकास आणि ज्ञानवाटप केंद्र म्हणून वाढत्या भूमिकेचे प्रतीक आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय सचिव टी. के. रामचंद्रन, संयुक्त सचिव (पीएचआरडी), बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय संदीप गुप्ता; आयपीएचे व्यवस्थापकीय संचालक, विकास नरवाल ; जेएनपीएचे अध्यक्ष तसेच व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ ; जेएनपीएतील विभागप्रमुख आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी यांना बंदर संचालन, प्रशासन, नियमावली, आणि भविष्यासाठी सक्षम समुद्री पद्धतींशी परिचित करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे.

जेएनपीएचे अध्यक्ष तसेच व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ म्हणाले, “जेएनपीएमध्ये, कौशल्य संपन्न मनुष्यबळ विकसित करणे हे आधुनिक बंदर पायाभूत सुविधांच्या बांधणी इतकेच महत्त्वाचे आहे. इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पहिली बॅच आयोजित करणे हे ज्ञानवाटप आणि कौशल्यविकासासाठी आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या कोर्सच्या शेवटी सहभागी अधिकाऱ्यांना समृद्ध अनुभव मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे.”

सक्षम सागरी कर्मचाऱ्यांचा विकास शक्य

“समुद्री क्षेत्र आपल्या राष्ट्राच्या आर्थिक वाढीच्या हृदय भागात आहे आणि भविष्यातील नेतृत्व म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील. या शिकण्याच्या आणि सहयोगाच्या प्रवासाची सुरुवात केल्याबद्दल मी प्रत्येकाचे अभिनंदन करतो. जेएनपीएने या कार्यक्रमाचे आयोजन करत ज्ञानवाटप, कौशल्य विकास व आंतर-बंदर सहकार्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याबद्दल कौतुक करतो. अशा उपक्रमांमुळे मंत्रालयाच्या दृष्टीकोनानुसार भविष्यासाठी सक्षम सागरी कर्मचाऱ्यांचा विकास शक्य होतो, जे नवोपक्रम, कार्यक्षमतेत सुधारणा, आणि जागतिक स्पर्धात्मकतेस हातभार लावतील.”

- टी.के.रामचंद्रन, सचिव, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय

प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप

जेएनपीएचे विभागप्रमुख आणि उद्योग तज्ज्ञांकडून सत्रे

संवादात्मक कार्यशाळा

बंदर व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबींवर प्रत्यक्ष अनुभव

दोन आठवड्यांचा प्रशिक्षण सत्र

साइट भेट, पॅनेल चर्चासत्र आणि केस स्टडी

या मार्गाने शिक्षण अधिक आकर्षक व व्यावहारिक होईल.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.