पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप पंतप्रधान मोदींना भेट

    02-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (PM Narendra Modi Receives The First Made In India Chip) भारताने आपली पहिली सेमीकंडक्टर चिप लाँच केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि. २ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली सेमिकॉन इंडिया २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी देशातील पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप स्वीकारली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबने विकसित केलेला विक्रम ३२-बिट प्रोसेसर, चार मंजूर प्रकल्पांमधील चाचणी चिप्ससह प्रोसेसर सादर केला.

एएनआय या वृत्तसंस्थने दिलेल्या माहितीनुसार, मंत्री वैष्णव म्हणाले की, ही कामगिरी २०२१ मध्ये सुरू झालेल्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत देशाच्या जलद प्रगतीचे प्रतिबिंब आहे. "काही वर्षांपूर्वी, आपल्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने चालणारी एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपण पहिल्यांदाच भेटलो होतो. साडे तीन वर्षांच्या अल्पावधीत, जग भारताकडे आत्मविश्वासाने पाहत आहे. आज, पाच सेमीकंडक्टर युनिट्सचे बांधकाम जलद गतीने सुरू आहे. आम्ही नुकतीच पंतप्रधान मोदींना पहिली 'मेड-इन-इंडिया' चिप सादर केली," असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "भारत स्थिरता आणि विकासाचा दीपस्तंभ म्हणून उदयास आला आहे." पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा विक्रम प्रोसेसर कठोर प्रक्षेपण वाहन परिस्थितीत वापरण्यासाठी पात्र ठरला आहे. यावेळी त्यांनी भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमविषयी माहिती देताना ७६,००० कोटी रुपयांच्या उत्पादन संलग्न योजनेचा समावेश असल्याचे सांगितले.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\