
मुंबई : बांग्लादेशमध्येसूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात आली आहे.
शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर बांग्लादेशातकट्टरपंथी शक्ती डोके वर काढत आहेत. हे लोक वहाबीइस्लामच्या कठोर नियमांचे पालन करतात, जे सूफी परंपरांना अजिबात सहन करत नाहीत. सूफी संतांच्या मजार व दर्गे, जिथे लोक प्रेमाने व भक्तिभावाने माथा टेकतात, त्या त्यांना मूर्तिपूजेसारख्या वाटतात. कट्टरपंथ्यांचे म्हणणे आहे की, इस्लाममध्ये कोणत्याही रचनेला किंवा कबरीला पूजणे कडक मनाई आहे. त्यामुळे ते या स्थळांना तोडणे, लुटणे यामध्ये गुंतलेले आहेत. हे हल्ले देशभर पसरलेले असून विशेषतः ज्या भागांत सूफीमजार अधिक आहेत, तिथे तीव्र आहेत. याआधी हिंदू मंदिरे, ख्रिश्चन चर्च आणि अहमदिया समुदायाच्या मशिदींवर हल्ले झाले होते, मात्र आता सूफी स्थळेसुद्धा असुरक्षित ठरली आहेत.
हे हल्ले अत्यंत क्रूर पद्धतीने केले जात असून १०० पेक्षा जास्त अशा घटना नोंदल्या गेल्या आहेत. सूफीमजार हे फक्त निमित्त आहे; प्रत्यक्षात हे हल्ले बांग्ला समाजाच्या मूल्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न आहेत. हिंदू समाजाशी असलेला सद्भावही मोडून काढण्याची ही एक कटकारस्थानासारखी योजना दिसते. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने या हल्ल्यांवर पूर्ण मौन धारण केले आहे.