मुंबई : (iPhone 17) अॅपलने भारतात लाँच केलेल्या बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीजची विक्री आजपासून (दि. १९ सप्टेंबर) अधिकृतपणे सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली या शहरांमधील अॅपल स्टोअर्सबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील अॅपल स्टोअरबाहेर काही तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यांना थांबवण्यासाठी सीआरएफ आणि स्टोअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करावा लागला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर सीआरएफ आणि स्टोअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना थांबवले, परंतु, त्यावेळी एका तरुणाने सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली. या गोंधळामुळे काही काळासाठी स्टोअरच्या कामकाजावर परिणाम झाला, मात्र, काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. . या घटनेमुळे आयफोनसाठी भारतीय ग्राहकांमध्ये असलेल्या क्रेझची झलक पुन्हा एकदा दिसून आली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\