'फिजिओथेरपी'चे वाढते महत्त्व!

    16-Sep-2025
Total Views |

गेल्याच आठवड्यात ‘जागतिक फिजिओथेरपी दिन’ साजरा झाला. पण, आज-काल ‘फिजिओथेरपी’ हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. पण, नेमके फिजिओथेरपी म्हणजे काय? फिजिओथेरपी डॉटर काय करतात? आणि कोणकोणत्या आजारांवर फिजिओथेरपीने उपचार होऊ शकतात? याविषयी माहिती देणारा हा लेख...

फिजिओथेरपी म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, फिजिओथेरपी ही एक विज्ञानाधारित वैद्यकीय शाखा आहे, जी शरीराची हालचाल, कार्यक्षमता आणि एकूण आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. फिजिओथेरपिस्ट डॉटर हे विविध आजारांचे मूल्यमापन व उपचार करतात.

फिजिओथेरपिस्ट कसे बनतात?

बारावीमध्ये विज्ञान शाखा निवडलेले आणि ‘नीट-युजी’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी राज्यातील विविध महाविद्यालयांतून फिजिओथेरपी शिकू शकतात. फिजिओथेरपी ही चार वर्षे + सहा महिने (इंटर्नशिप) असलेली पदवी अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर B.P.Th (Bachelor of physiotherapy) ही पदवी मिळते. त्यानंतर विद्यार्थी विशेष शाखेत पदव्युत्तर शिक्षण (specialization) घेऊ शकतात किंवा थेट लिनिकल प्रॅटिस सुरू करू शकतात.

फिजिओथेरपीच्या विविध विशेष शाखा

पदवी घेतल्यानंतर खालीलप्रमाणे विविध स्पेशालिटी शाखा असतात :

१. Musculoskeletal physiotherapy - ही शाखा हाडे व स्नायू संबंधित समस्यांवर उपचार करते. उदा. स्पॉन्डिलोसिस, रॅडियुलोपथी, स्नायूंमध्ये ताण, फ्रॅचरनंतर रिहॅबिलिटेशन, तसेच हिप व नी-रिप्लेसमेंट सर्जरीनंतरचा व्यायाम.
सर्जरीनंतर फिजिओथेरपी केल्याने हालचाल, ताकद सुधारते आणि जीवनमान चांगले राहते.

२. Neurophysiotherapy - पक्षाघात, spinal cord injury, अपघातानंतरच्या अडचणी अशा न्यूरोलॉजिकल परिस्थितींमध्ये हालचाल
सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. प्रौढ आणि लहान मुलांवरही उपचार केले जातात.

३. Cardiovascular Respiratory physiotherapy -
हृदयाचे ऑपरेशननंतर उजझऊ, अस्थमा यांसारख्या श्वसनाच्या आजारांनंतरची पुनर्वसन प्रक्रिया या शाखेत केली जाते. आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांवरदेखील या तज्ज्ञांद्वारे उपचार होतात.

४. Community physiotherapy - वृद्ध, महिलांचे आरोग्य, कामाच्या ठिकाणी होणारे आजार अशा समाजातील विशिष्ट गटांमध्ये आरोग्य सुधारण्यावर काम करणारी शाखा.

५. Sports physiotherapy - खेळाडूंना होणार्‍या दुखापतींचे उपचार आणि पुनर्वसन. तसेच दुखापतींपासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम तयार केले जातात.

फिजिओथेरपिस्टकडे कधी जावे?

रुग्णाच्या निदानानुसार डॉटर किंवा सर्जनकडून रेफरल मिळते किंवा काही रुग्ण स्वतःच पूर्वानुभवाच्या आधारे थेट फिजिओथेरपिस्टकडेही जातात.

कोणते सामान्य आजार फिजिओथेरपिस्टद्वारे उपचार केले जातात?

स्नायू व हाडांशी संबंधित अडचणी : मानदुखी, पाठदुखी, स्पॉन्डिलोसिस, रॅडियुलोपथी, सांधांची शस्त्रक्रिया, फ्रॅचरनंतर पुनर्वसन

न्यूरोलॉजिकल अडचणी : मेंदूचा स्ट्रोक, अर्धांगवायू, स्पायनल इजा, ब्रेन सर्जरीनंतरची कमजोरी

हृदय व श्वसनाशी संबंधित अडचणी :
उजझऊ, अस्थमा, बायपास सर्जरी, व्हॉल्व रिप्लेसमेंट, हार्ट फेल्युअर यांसारख्या आजारांनंतरचे पुनर्वसन

महिलांचे आरोग्य :
झउजऊ, गर्भधारणेपूर्वी व नंतरची काळजी, गर्भाशय काढल्यानंतरचे पुनर्वसन

जीवनशैलीजन्य आजार : लठ्ठपणा, टाईप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये, शारीरिक हालचाल अत्यावश्यक झाली आहे. सततचा ताण, कामाचा त्रास, चुकीची आसनशैली यांमुळे अनेक आजार होत आहेत, जे आपली कार्यक्षमता कमी करतात. फिजिओथेरपी ही केवळ उपचाराची पद्धत नाही, तर ती आरोग्य व कार्यक्षमतेकडे परतण्याचा मार्ग आहे. ही उपचारपद्धती शारीरिक हालचाली सुधारते, दुखापती व आजारांपासून प्रतिबंध करते आणि जीवनमान उंचावते.

- डॉ. निरंजन नाशिककर
(लेखक कार्डिओवॅस्युलर आणि रेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट आहेत.)
८५९१८१८७४७