डोंबिवली : डोंबिवली येथील सुप्रसिद्ध डॉ. शैलेश ढवळीकर यांना रविवारी आयुष महासन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केन्द्र- राजकोट टीडीसी (पीपीडीसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकारची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.
नवी मुंबई येथे नुकताच हा सोहळा पार पडला. आयुर्वेद, योग नेचरोपॅथी, होमियोपॅथी, युनानी, सिद्ध, एक्युपंक्चर, एक्युप्रेशर अशा विविध आयुष क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चिकिसक व थेरपिष्ट यांना या पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला भारतातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, डॉ. मंगला कोहली, सल्लागार युनायटेड नेशन चाईल्ड वुमेन व पूर्व सहाय्यक महानिदेशक, स्वास्थ सेवा निदेशालय, स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार, डॉ. प्रवीण जोशी राष्ट्रीय सलाहकार आईमा एवं पूर्व उपनिदेशक टिडीसी आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.