मुंबई : कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक वस्त्यांच्या कथित विकासासाठी ३९८ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुस्लिम तुष्टीकरण’ धोरणाचा भाग म्हणून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त होताना दिसतोय. अशी माहिती आहे की, राज्यातील २२ मुस्लिमबहुल विधानसभा क्षेत्रांमध्ये ही रक्कम खर्च होणार आहे. या भागांतील मागासलेल्या वस्ती व मुस्लिम कॉलनींना मॉडेल कॉलनी म्हणून विकसित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निव्वळ व्होटबँक म्हणून काँग्रेस सरकार धार्मिक आधारावर पक्षपाती वागणूक देत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यांच्यामते हिंदू वस्त्यांच्या विकासासाठी काँग्रेस सरकारने कधीच इतका खर्च केल्याचे किंवा त्याबद्दल गंभीर चर्चा केल्याचे दिसले नाही. नेटकऱ्यांनी सुद्धा काँग्रेसवर थेट टीका करत म्हटले, की हिंदू करदात्यांच्या पैशाचा वापर त्यांच्यावरच दगडफेक करणाऱ्यांची घरे बांधण्यासाठी केला जात आहे.
सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूमधील शिवाजी नगर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी बॅसिलिका यांच्या नावावर ठेवण्याची नुकतीच घोषणा केली. ही घोषणा सेंट मेरी बॅसिलिकाच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी करण्यात आली. दरम्यान, भाजपाने काँग्रेस सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या निर्णयाची निंदा केली आणि म्हटले की काँग्रेस नेहरूंच्या काळापासूनच शिवाजी महाराजांचा अपमान करत आली आहे. भाजपाचे म्हणणे आहे की हा निर्णय हिंदू भावनांना ठेच पोहोचवणारा आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक