मुंबई : क्रूर मुघल शासक औरंगजेबाच्या समर्थनात काही धर्मांधांनी नारेबाजी आणि त्याच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरण अकोला येथे घडले असून यासंबंधित एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतो आहे. अशी माहिती आहे की, हा प्रकार अकोला शहरातील तिलक रोड येथील जुना कपडा बाजार चौकात घडला.
सदर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून देखील संताप व्यक्त होताना दिसतोय. धर्मांधांकडून झळकवण्यात आलेले पोस्टर हे हिंदी चित्रपट ‘तानाजीः द अनसंग वॉरियर’ मधील औरंगजेबाच्या पात्राचे आहे. अँग्लो-इंडियन अभिनेता ल्यूक केनी याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. असे असले तरी हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या क्रुरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण कदापी सहन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका समाजमाध्यमांद्वारे घेतली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून मिरवणुकीच्या दिवशीच औरंगजेबाची ही पोस्टर्स जप्त करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
टिपू सूलतानचे महिमामंडण
गेल्या आठवड्यात ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान सुद्धा काही धर्मांधांनी औरंगजेब तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या पोस्टर्सवर दुग्धाभिषेक केल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर ईद-ए-मिलादुन्नबीच्याच दिवशीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. ज्यामध्ये आझाद समाज पार्टी तथी भिम आर्मी (अकोला जिल्हा) चे कार्यकर्ते हातात टिपू सूलतानचे महिमामंडन करताना दिसतायत.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक