स्पाईसजेट विमानाची मोठी दुर्घटना टळली, चाक निखळलेल्या स्पाइसजेटचे सुरक्षित लँडिंग ; विमानाचे ७५ प्रवाशांसह सुरक्षित लँडिंग

Total Views |

मुंबई, चाक निखळलेल्या स्पाइसजेट कंपनीच्या बॉम्बार्डियर विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. ७५ प्रवाशी असलेल्या स्पाइसजेट क्यू ४०० या विमानाने गुजरातच्या कांडला विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र त्याचे एक चाक तेथील विमानतळावरच निखळले. मात्र, शुक्रवार,दि.१२ रोजी संध्याकाळी साधारण चार वाजता विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग झाले.

गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानासोबत शुक्रवारी एक मोठी दुर्घटना होता होता टळली. विमानाने उड्डाण घेताच त्याचे एक चाक तुटून खाली जमिनीवर पडले. या विमानात एकूण ७५ प्रवासी होते. मात्र, सुदैवाने विमान मुंबईमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. विमानाचे चाक खाली पडल्याची माहिती कांडला एटीसीने दिली, त्यानंतर मुंबई विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, "१२ सप्टेंबर रोजी, कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट 'क्यु४००' विमानाचे एक बाहेरील चाक उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर पडलेले आढळले. मात्र, विमानाने आपला मुंबईचा प्रवास सुरू ठेवला आणि ते सुरक्षितपणे उतरले आहे. लँडिंगनंतर, विमान टर्मिनलपर्यंत पोहोचले आणि सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले."


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.