उज्वला मंडळाचा ७६व्या शारदोत्सवाचे आयोजन

    11-Sep-2025   
Total Views |

कल्याण : उज्वला मंडळाच्या शारदोत्सवाची सर्वच कल्याणकार मोठ्या उत्साहाने वाट पाहतात. या शारदोत्सवाचा एक भाग म्हणून रविवार दि. १४ सप्टेंंबर रोजी सकाळी ११वाजता "माणिक मोती " हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत अशोक हांडे यांचा हा रसिक मान्य कार्यक्रम अत्रे रंग मंदिरात होणार आहे . तर शारदोत्सव दि. २२ ते २६ सप्टेंबर रोजी सायं ५.३० ते ८.३० या वेळेत अभिनव विद्या मंदिर सभागृह , पारनाका कल्याण येथे होणार आहे . श्री स्वामी समर्थ मंडळाचे —देवी सूक्त, मी 'ती'स्त्री वक्त्या प्राची गडकरी.. पसायदान वक्ते विशाल कवीश्र्वर, डोंबिवली. 'शककर्ते शिवराय' अभयराजे जगताप ठाणे ही अभ्यासपूर्ण व्याख्याने आयोजिली आहेत. तसेच भोंडल्याने शारदोत्सवाची सांगता होणार आहे . या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सुनीता केळकर यांनी केले आहे.