डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी शिक्षक दिनानिमित्त “उदयन्तु प्रारंभ आणि गुरुवंदना" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन एल पी कोच सुनील सावंत हे होते, ओंकार इंटरनॅशनल स्कूलच्या रो. दर्शना सामंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वर्षा काटेकर यांनी सरस्वती प्रार्थना सादर केली.
संदीप घरत यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित करीत गुरूंची महती विषद केली. उदयन्तु प्रकल्पात काम करणारे शिक्षक सहा महिने हा प्रकल्प राबवित असले तरी ऑनलाइन असल्यामुळे हे कार्यकर्ते लोकांच्या नजरेत कधीही येत नाहीत. तरीही गेली पाच वर्ष सातत्याने हे कार्य करणाऱ्या, रो, शिल्पा कोठावदे( प्रकल्प प्रमुख ), रो विनायक आगटे ( मानद सचिव), संध्या आष्टीकर व वर्षा काटेकर , तसेच या प्रकल्पात नव्याने सहभागी होणाऱ्या शिक्षकांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. सुनंदा जगताप यांनी शिक्षक दिनानिमित्त सुंदर कविता सादर केली.
त्यानंतर उदयन्तु प्रकल्पात स्पर्धात्मक चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 40 विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट तर्फे स्कॉलरशिपच्या पुस्तकाचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दर्शना सामंत यांनी प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संयमाने विषय समजेपर्यंत शिकवले पाहिजे. प्रत्येकाची कौटुंबिक, आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी वेगळी असते याचा विचार करून शिकवलं पाहिजे. प्रत्येक शिक्षकांनी आदर्श आणि अनुकरणीय शिक्षक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच विद्यार्थ्यांमधून उद्याचे शिक्षक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशात व देशासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे विविध क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणा ऱ्या तीस हुन अधीक सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात शिक्षण तज्ञ दर्शना सामंत, प्रा. विनय भोळे यांचाही समावेश होता.
सुनील सावंत यांनी आपल्या अत्यंत प्रभावी सादरीकरण शैलीत, सतत शिकण्याचा ध्यास हे उत्तम शिक्षकाचे लक्षण असल्याचे सांगितले. शिकविण्या व्यतिरिक्त मुलाना ग्रासु शकतील अशा दोष निवारणा साठी शिक्षका नी काम करणे आवश्यक असल्याचे ही त्यानी सांगितले .
क्लबच्या उदयनतु प्रकलपाचे व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि उदयन्तुच्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्मरणशक्ती वर्गात सहा महिन्यासाठी मोफत प्रवेश जाहीर केला. या कार्यक्रमास 40 विद्यार्थी, 25 उत्सव मूर्ती शिक्षक, पालक,शाळांचे शिक्षक, रोटरी सदस्य असे मिळून 110 लोक उपस्थित होते. या प्रकल्पा च्या प्रमुख रो. शिल्पा कोठावदे, प्रकल्प संचालक विशाल सारुक होत्या. रो जोसेफ जोशी आणि रो. प्रमोद शेणवयी यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिले तर रो गौरव त्यागी व रो अक्षदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. पूर्व अध्यक्ष दिलीप काटेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
काय आहे उदयन्तु!
उदयन्तु या क्लबच्या प्रकल्पाचे हे सहावे वर्ष आहे . माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी, या प्रकल्पाद्वारे,मराठी माध्यमातील मुलांची ऑनलाईन तयारी करून घेतली जाते. जेणे करून स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलांची मानसिक आणि शैक्षणिक तयारी करण्यावर यात भर दिला जातो. कमीत कमी दर आठवड्यात पाच दिवस हे वर्ग सायंकाळी सात ते नऊ या वेळात घेतले जातात. इंग्रजी, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सर्व विषय संस्थेचे उत्साही हौशी सदस्य शिकवतात. सप्टेंबरला सुरू होणारे हे वर्ग फेब्रुवारी मध्यापर्यंत चालतात. आतापर्यंत दीडशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे त्यातील पंधराहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अगदी जिल्हा पातळीवर सुद्धा त्यातील विद्यार्थी चमकले आहेत. यातील बरेच विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील आहेत. अगदी टिटवाळ्याजवळील मांडा, कल्याण तिसाई अशा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घेऊन यश मिळवलं हे गौरवास्पद आहे असे संस्थेकडून सांगण्यात आले.