राष्ट्रीय नेमबाज शरयू मोरे हिचे अपघाती निधन

    01-Sep-2025   
Total Views |

पुणे : (National Shooter Sharayu More Accidental Death Baramati) राष्ट्रीय नेमबाज शरयू मोरे हिचे वयाच्या २२व्या वर्षी बारामती येथे अपघाती निधन झाले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची ती कन्या होती. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या तिच्या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

शरयू ही बारामतीमध्ये एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री ती तिच्या मैत्रिणीसह दुचाकीवरुन हॉस्टेलकडे येत असताना भिगवण रस्त्यावर ऊर्जा भवनाजवळ गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. यात शरयूचा जागीच मृत्यू झाला. तर तिची मैत्रीण यात जखमी झाली. भिगवण रस्त्यावरील ऊर्जा भवनजवळ हा अपघात झाला. या घटनेवर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

कोण होती शरयू मोरे ?

शरयूने नीटच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. सध्या ती एम.बी.बी.एसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती साताऱ्यातील सासुर्वे गावची रहिवासी होती. राष्ट्रीय नेमबाज म्हणून ती नावारुपाला आली होती. ती दिल्लीमध्ये झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. तसेच १२ बोअर शॉटगन-ट्रॅप या क्रीडा प्रकारात तिने विजेतेपद मिळवले होते. या शिवाय तिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले होते.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\