मराठा आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान; मालवाहतूक ठप्प, राज्य सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

    01-Sep-2025   
Total Views |

Maratha protest affecting business, traders seek govt
मुंबई : (Maratha protest affecting business, traders seek govt's intervention) सध्या मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील व्यापार आणि व्यवसायावर होत असून व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण मुंबईतून जाणारे मार्ग अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे अवजड वाहने आणि ओव्हर डायमेन्शनल कार्गोसाठी संपूर्णपणे बंद असल्याने मालवाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार, मोर्चामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शनिवार-रविवार सुट्टीच्या काळात ग्राहकांची वर्दळ थांबली आहे. त्यामुळे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सलग दोन दिवस व्यापार ठप्प राहिल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने किंवा उच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक संपूर्ण बंद पडलेली आहे. निर्यातदार, आयातदार आणि प्रोजेक्ट कार्गो ऑपरेटर्सना मोठ्या नुकसान झाले आहे. एक महत्वाचे उदाहरण म्हणजे जहाज जबल अली नाईनसाठी रवाना होणारी मोठी अवजड मशिनरी जिचे प्रस्थान उद्या सकाळी होणार होते. ही मशिनरी आज सायंकाळपर्यंत बंदरात पोहचणे गरजेचे होते. परंतू अवजड वाहनांना रोखण्यात आले आहे.जर ही मशिनरी लवकर पोहचली नाही तरी मोठा दंड आणि करार रद्द होऊन जागतिक बाजारात भारताच्या व्यापार धोरणावर परिणाम होणार आहे.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\