मुंबई : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात विराजमान प्रभु श्रीरामलला व राम दरबारातील लक्ष्मण-हनुमान यांस रक्षाबंधनाचे औचित्य साधून शनिवारी 'रक्षासूत्र' (राखी) देण्यात आले. या राख्या शुक्रवारी रथयात्रेद्वारे श्रृंगी ऋषी बाबा महोत्सव सेवा संस्थेचे पदाधिकारी व श्रद्धाळू घेऊन आले. सुरक्षा व्यवस्थेमध्ये रथयात्रेसह कारसेवकपूरम येथे पोहोचलेल्या सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला श्रद्धाळूंनी राख्यांव्यतिरिक्त सर्व भेटवस्तू श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपतराय यांच्याकडे सुपूर्द केल्या.
चंपतराय यांनी सर्वांना आश्वासन दिले की त्यांच्या भावनांचा सन्मान राखून सर्व सामग्री योग्य ठिकाणी पोहोचवली जाईल. ते म्हणाले की, धर्म-संस्कृती व परंपरांचे संरक्षण हे भावी पिढीसाठी आवश्यक आहे, जे समाजाच्या सातत्याचे प्रतीक आहे आणि सर्वांना एकतेच्या सूत्रात बांधून ठेवण्याची प्रेरणा देते. समाजातील सर्व घटक एकमेकांचे पूरक आहेत.
राम-जानकी मंदिराचे महंत हेमंत दास म्हणाले की, रामललांसाठी परंपरेनुसार राख्या पाठवण्याची पद्धत सुरूच आहे. त्याच परंपरेच्या पालनार्थ सर्व भाविक येथे आले आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष सिंह, श्रृंगी ऋषी आश्रमचे पुजारी महेंद्र गोस्वामी, संस्थेचे संरक्षक उदयभान गुप्ता यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक