सरसंघचालकांनी नागपूरच्या 'शिवशास्त्र शौर्य गाथा' प्रदर्शनाला दिली भेट

    09-Aug-2025   
Total Views |

मुंबई  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे शिवशास्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाला नुकतीच भेट दिली. यावेळी छोट्या मावळ्यांनी त्यांच्यासमोर विविध युद्धकला आणि युद्ध कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रदर्शनात मराठ्यांनी स्वराज्याच्या लढाईत वापरलेली विविध शस्त्रे प्रदर्शित केली आहेत. या शस्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व सर्वसामान्यांना समजावे हा प्रदर्शनामागचा उद्देश आहे.

सध्या हे शस्त्र लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या दक्षिण आशियाई संग्रहाचा भाग असून, १७ व्या शतकात दक्षिण भारतातील दख्खन प्रदेशात बनवल्याची मान्यता आहे. वाघनखासह, प्रदर्शनात १९० इतर मराठा शस्त्रे देखील प्रदर्शित केली आहेत, ज्यात विविध प्रकारचे भाले, कुऱ्हाडी, तलवारी, ढाल, खंजीर, दांडपट्टा आणि मध्यवर्ती संग्रहालयातील विशेष अग्निबाण यांचा समावेश आहे.

सरसंघचालकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले की, संग्रहालये केवळ मनोरंजनासाठी नसून आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या कामगिरीची आणि वैभवाची जाणीव करून देण्यासाठी असतात. मी लहानपणापासून भेट देत असलेले 'अजब बंगला' एक उत्तम सांस्कृतिक संग्रहालय बनले आहे. संग्रहालय व्यवस्थापनाच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक