मुंबई, " भारतीय विचार हा खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी व मनुष्याच्या उत्कर्षाचा विचार आहे. त्याचबरोबर भारतीय ज्ञानपरंपरा म्हणजे सत्याचा शोध. " असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी यांनी केले. श्री कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
दि. ८ ऑगस्ट रोजी, ठाण्याच्या श्रीराम व्यायाम शाळेतील सभागृहात लेखक अभिजीत जोग यांच्या " भारत : सत्य, सत्व, स्वत्व" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी अविनाश धर्माधिकारी, लेखक दीपक करंजीकर, तथा श्री कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेच्या कार्यकारणी मधील सदस्यांच्या उपस्थितीत लेखक अभिजीत जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. सदर कार्यक्रमामध्ये अविनाश धर्माधिकारी यांनी युरोपीय साम्राज्यवाद, धर्मांतर, सांस्कृतिक विकृतीकरण, डाव्यांनी लिहिलेला खोटा इतिहास आदी विषयावर भाष्य केले. त्याचबरोबर चुकीच्या अजेंड्यावर मात करायची असेल तर " भारत : सत्य, सत्व, स्वत्व" सारख्या पुस्तकांचे लेखन व्हायला हवे व समाज म्हणून आपण वाचलं पाहिजे असे मत व्यक्त केले. आपली भूमिका मांडताना लेखक अभिजीत जोग म्हणाले की राष्ट्राची खरी ओळख ही राष्ट्राची खरी संपत्ती असते, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या वैचारिक क्षेत्रावर असलेल्या काही लोकांच्या प्रभुत्वामुळे भारताला आत्मवंचनेचा सामना करावा लागला. पण तू भारत हे पराभूत राष्ट्र नसून, हा तत्वज्ञ ऋषींचा देश आहे, या देशाला एक समृद्ध वारसा आहे, आणि हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. " सांस्कृतिक विकृतीकरणाला भारत समर्थपणे उत्तर देतो आहे "
" परकीय आक्रमणकर्त्यांचे गुणगान गाणारी, शालेय पाठ्यपुस्तकात मुलांना चुकीचा इतिहास शिकवणारी या देशात होऊन गेली, हे आपलं दुर्दैव. परंतु आता, अशा प्रकारच्या सांस्कृतिक विकृतीकरणाला भारत समर्थपणे उत्तर देतो आहे. त्याचबरोबर भारताचे लष्करी सामर्थ्य काय आहे याचं सुद्धा दर्शन जगाला घडलं. भारताच्या परिवर्तनाचा हाच सकारात्मक विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. "
अविनाश धर्माधिकारी " आत्मवंचनेच्या वाटेवर दीपस्तंभाचा प्रकाश "
" लेखक अभिजीत जोग यांनी लिहिलेले
" भारत : सत्य, सत्व, स्वत्व" हे पुस्तक म्हणजे आत्मवंचनेच्या वाटेवर दीपस्तंबाचा प्रकाश आहे असं मला वाटतं. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे ही आत्मवंचना भारतीयांमध्ये रुजली. आपल्या सांस्कृतिक धारणा आपला वारसा, या आणि अशा असंख्य गोष्टींपासून अनभिज्ञ राहिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची आक्रमण आपल्यावर आज सुद्धा सुरू आहेत. मात्र अशा वैचारिक आणि सांस्कृतिक आक्रमणांना, अशा पुस्तकांच्या माध्यमातून आपण समर्थपणे उत्तर देत आहोत. "
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.