डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात नागरी वस्तीत राहणाऱ्या १०८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वाचा ट्रस्ट तर्फे नागरी झोपडपट्टी विभागातील मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. या मुलांना आरोग्य विषयक चांगल्या सवयी लागाव्यात, कौशल्य विकास व्हावा या हेतूने ही संस्था काम करते अश्या मुलांसाठी रोटरी भवन डोंबिवली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंधरा वर्षापर्यंतची १०८ मुले यात सहभागी झाली होती. सर्व मुलांच्या रोटरीतील निष्णात डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून काही औषधे डॉक्टरी सल्ल्यानुसार या मुलांना देण्यात आली.
प्रोजेक्ट डायरेक्टर रो.डॉ त्रिप्ती कोठारी,प्रोजेक्ट चेअर रो डॉ भक्ती लोटे, रो भीमराव सावंत,व रो सतीश अटकेकर यांनी मेडिकल कॅम्प यशस्वी करण्याकरता विशेष प्रयत्न केले. रोटेरियन दर्शना सामंत यांच्या माध्यमातून शिबिरातील मुलांसाठी मोफत बस सेवा देण्यात आली. रो.चंद्रशेखर शिंदे, रो. अथर्व जोशी, रो फर्स्टलेडी मंजिरी घरत यांनीही शिबिरास भेट देऊन उत्साह वाढवला. रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट चे अध्यक्ष डॉक्टर संदीप घरत आणि मानद सचिव विनायक आगटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.