गडचिरोली अपघातावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख! मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर

    07-Aug-2025   
Total Views |

गडचिरोली : (CM Devendra Fadnavis On Gadchiroli Accident) गडचिरोलीतील नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आरमोरी येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. काटली गावाजवळ सकाळी भरधाव ट्रकने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत एकूण चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गंभीर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरला हेलिकॉप्टरने हलवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची पोस्ट



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\