डोंबिवलीतील 1005 विद्यार्थ्यांनीनी पाठवल्या सैनिकांना राख्या  ; स्वतः बनविलेल्या राख्यातून 'सैनिक हो तुमच्यासाठी ' उपक्रम

    07-Aug-2025   
Total Views |

डोंबिवली  : डोंबिवलीतील १००५ विद्यार्थिनींनी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम राबवित देशाच्या सीमेवरील भारतातील 12 रेंजिमेंटला व सियाचीन ग्लोशियाला राख्या पाठवल्या. हा उपक्रम डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथील मॉडेल महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राबविला.

रिया रणजित राय या विद्यार्थिनीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीना राख्या बनविण्यास शिकवले. देशभक्तीवर आधारित या उपक्रमात सैनिकांकरता मॉडेल महाविद्यालयाच्या प्राचार्य रवींद्र बम्बार्डेकर, उपप्राचार्य शर्वरी कुलकर्णी आणि श्रीलता राजाराम यांनी जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून 'एक राखी एक संदेश' राबविला. प्राध्यापक मेघना शिंदे, प्राध्यापक पियाली भट्टाचार्य व जयहिंद फाउंडेशनच्या सदस्य पुनम फडतरे (असिस्टंट टीचर ज्युनियर कॉलेज आयटी डिपार्टमेंट ) व केरलीय समाज यासह महाविद्यालयातील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.