सोलापूरमध्ये १०६.९ मिमी पावसाची नोंद!

    06-Aug-2025   
Total Views |

सोलापूर : (Solapur Heavy Rain) सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत सोलापूरमध्ये १०६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ४ ऑगस्टच्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा पाऊस झाल्याची माहिती आहे.

निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी पहायला मिळत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुसळधार पावसामुळे सोलापूरमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने, प्रशासनाच्या आपत्कालीन तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. तब्बल १२ दिवसांनी पावसाने सोलापुरात हजेरी लावली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\