महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची तत्परता वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा ; राज्य सरकारच्या याचिकेत सहभागी होणार

    06-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी पुढाकार घेतला असून बुधवार, ६ ऑगस्ट रोजी त्यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. दरम्यान, वनताराने राज्य सरकारला न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आश्वसन दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले की, "वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी मुंबईत सविस्तर चर्चा केली.महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता."

पुनर्वसन केंद्र उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार

"कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीसुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....