रानपिंगळा म्हणजे छोट्या आकाराची घुबड प्रजाती. आपल्या भागात सामान्यपणे सर्वत्र आढळणाऱ्या ठिपकेवाला पिंगळा या घुबडा प्रमाने दिसणारा व साधारणता त्याच आकाराचा. भारतातील एकमेव दिवसा वावरणारा छोटा घुबड (international owl awareness day). इंग्रजीत या पक्षाची ओळख म्हणजे फॉरेस्ट आउलेट. विसाव्या शतकात या प्रजातीला ब्लेविटचा आउल (Blewitti’s owl) असे सुद्धा म्हटले जात असे. याच्या नावातील ब्लेविटी हा शब्द आला तो ब्रिटीश पक्षी अभ्यासक फ्रान्सिस रॉबर्ट ब्लेविट यांच्या नावावरून, ज्यांनी या पक्षाला प्रथम १८७२ मधे शोधून काढले होते (international owl awareness day). त्यांना हा पक्षी सामान्य पिंगळा पेक्षा वेगळा वाटल्याने त्यांनी गोळा केलेले तीन नमुने इ.स. १८७३ मध्ये प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ ए. ओ. ह्यूम यांचेकडे पुढील अभ्यासासाठी पाठवून दिलेत (international owl awareness day). ए. ओ ह्यूम यांनी त्या नमुन्याचा अभ्यास करून विश्लेषण व वर्गीकरण केले व ही नवीन प्रजाती असल्याचे संशोधन मांडले. (international owl awareness day)
ए. ओ ह्यूम यांनी या पक्ष्याचे नवीन प्रजाती म्हणून वर्गीकरण केल्यानंतर त्याकाळातील ब्रिटीश पक्षी अभ्यासकांनी त्याचा आपापल्या भागात शोध घेणे सुरु केले. त्यानंतर जवळपास चार वर्षानंतर फेब्रुवारी १८७७ ला व्हेलेंटाइन बेल या पक्षी अभ्यासकाने या पक्ष्याचा दुसरा नमुना ओडिशा राज्यातील संबलपुर भागातील खारीयार याठिकाणी मिळाला होता. त्यानंतर इ.स. १८८० ते ८३ दरम्यान महाराष्ट्रातील खानदेशच्या पश्चिमेकडील सातपुड्याच्या जंगलात जेम्स डेव्हिडसन या अभ्यासकाने शोध घेऊन या पक्ष्याचे चार नमुने मिळविलेत व याच भागातील शहाद्याच्या जंगलातून आणखी एक नमुना मिळविला. या नमुन्यांपैकी सात नमुने पुढे लंडन येथील नँचरल हिस्ट्री म्युझियम व अमेरिकेतील म्युझियममध्ये ठेवण्यात आले होते. १९८४ नंतर मात्र हा पक्षी अधिकृतपणे सापडल्याचे निदर्शनात आले नाही.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याला शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. डॉ. सालिम अली व त्यांचे सहकारी धिल्लन रिप्ले यांनी सुद्धा या प्रजातींना भारतात शोधण्यासाठी अनेक मोहिमा केल्यात. फेब्रुवारी १९७५ साली ओरिसातील उत्तर आणि पश्चिम भागातील जंगलात, १९ व्या शतकात ज्या ठिकाणांहून या रानपिंगळा पक्ष्याचे नमुने गोळा केले होते त्या पद्मपुर जवळील बुशना आणि फुलजन या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. त्याच भागातील महानदी परिसरातील संबलपूर आणि टीकापारा जंगलात सुद्धा त्यांनी ही शोध मोहीम राबविली. १९७५-७६ साली ओरिसातील बुशना आणि फुलजन तसेच सातपुड्यातील मेळघाट व गुजरातच्या काही भागात या पक्ष्याचा शोध घेतला होता. मात्र त्यावेळी हा पक्षी काही सापडू शकला नाही. डॉ. सालिम अली यांनी मात्र “हे पक्षी योग्य पद्धीतीने शोधल्या गेलेत तर सापडू शकतील” असा विश्वास व्यक्त केला होता. स्थानिक अभ्यासक आपापल्या स्तरावर या पक्ष्याचा शोध घेत होतेच.
या पक्ष्याच्या शेवटच्या नोंदीनंतर तब्बल ११३ वर्षानंतर अमेरिकन पक्षी शास्त्रज्ञ पामेला रासमुसेन, बेन किंग आणि डेव्हीड अबोट यांनी या पक्ष्याच्या लंडन येथील ब्रिटीश म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या नमुन्यांचा व त्यांच्या नोंदीचा अभ्यास करून हा पक्षी भारतात पुन्हा सापडू शकेल असा विश्वास घेऊन १९९७ च्या नोव्हेंबर मध्ये भारतात येऊन याचा शोध सुरु केला. प्रथम १३ ते २२ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील गोमार्धा अभयारण्य, चुराभाटी, शिरपूर या प्रदेश ओरिसा मधील काही ठिकाणे पालथी घातलीत. त्यानंतर या पक्ष्याचे १८८० दरम्यान सर्वात जास्त म्हणजे पाच नमुने ज्या ठिकाणाहून गोळा केल्या गेले होते तो भाग म्हणजे महाराष्ट्राच्या खानदेशातील सातपुड्यात या चमूचा शोध सुरु झाला व २५ नोव्हेंबर ला नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याच्या उत्तरेकडील जंगलामध्ये सकाळी ८.३० वाजता हा पक्षी दिसून आला. पुढील दोन तीन दिवस सतत शोध घेऊन वेगवेगळ्या रानपिंगळ्याची फोटो, व्हिडीओ व स्केचेस काढून त्याची सखोल निरीक्षणे केलीत. हाती आलेल्या माहितीवरून तो रानपिंगळाच असल्याची खात्री झाल्यानंतर ही चमू मुंबईला आली. मुंबई येथे येऊन बिएनएचएसचे तत्कालीन संचालक डॉ. असद रहमानी यांना त्याविषयी माहिती देऊन चर्चा केली व नंतर ती माहिती बीबीसी सह जगभरातील माध्यमांव्दारे प्रसिद्ध केली गेली. एका नामशेष झाल्याची भीती असल्याचा पक्षाचा पुनर्शोध लागला. भारतातील नामशेष झालेल्या पक्ष्यांच्या यादीमधील एक पक्षी पुन्हा सापडला, ही घटना भारतीय पक्षीशास्त्रासाठी फार मोठी घटना होती.
- डॉ. जयंत वडतकर
(लेखक महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष आहे.)
98228 75773