गणेश मूर्त्या वेळेवर तयार झाल्या नाही, लोकांनी दमदाटी केली, म्हणून मी पळून गेलो; पोलिसांच्या ताब्यात आलेल्या मूर्तीकाराने मांडली व्यथा

    30-Aug-2025   
Total Views |


डोंबिवली , डोंबिवलीत पळून गेलेला मूर्तीकार अखेर पोलिसांसमोर आला आहे. मूर्तीकार प्रफूल्ल तांबडे याचे आई वडील हे प्रफूल्लला घेऊन विष्णूनगर पोलिस ठाण्यात घेऊन आले. पोलिस त्याचा शोध घेत होते. ज्या लोकांनी त्याच्याकडे गणेश मूर्ती बूक केली होती. त्या पावत्या प्रफूल्लककडे आहे. ते पैसे प्रफूल्लचे कुटुंबिय परत करणार आहेत. मात्र काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला दमदाटी केली होती त्यामुळे तो भयभीत झाला. त्याचे काही बरे वाईट होईल या भितीपोटी तो डोंबिवलीतून पळून गेला होता. तो सातारा येथे लपून बसला होता.

डोंबिवलीतील चिनार मैदानात आनंदी कलाकेंद्र आहे. हे कला केंद्र मूर्तीकार प्रफूल्ल तांबडे चालवित होते. दोन दिवसापूर्वी प्रफूल्ल हा कलाकेंद्रातून पळून गेला. क्षमतेपेक्षा जास्त काम असल्याने त्याच्यावर काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण आला. काम वेळेत पूर्ण होणार नाही. या चिंतेत तो होता. त्या रात्री ज्या गणेश मंडळांनी मूर्ती बुक केल्या होत्या. त्यापैकी काही मंडळाचे कार्यकर्ते त्याच्याकडे आले. तो मूर्ती देऊ शकला नाही. या कारणावरुन कार्यकर्त्यांनी त्याला दमदाटी केली. आत्ता शेकडोच्या संख्येने मूर्तीच्या आॅर्डर घेतल्या आहेत. त्या पूर्ण करु शकणार नाही. तो त्या ठिकाणी पळून गेला. दुसऱ्या दिवशी त्याठीकाणी लोकांनी त्याच्या कला केंद्रात मोठी गर्दी केली. मूर्ती मिळाली नाही म्हणून लोकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विष्णूनगर पोलिस प्रफूल्ल तांबडे यांच्या शोधात होते. प्रफूल्ल हा साताऱ्यात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिस सातारा येथे जाण्याच्या तयारीत होते. त्या आधी प्रफूल्ल त्याच्या आईवडिलांसोबत पोलिस ठाण्यात पोहचला. तो का पळून गेला. त्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्या रात्री त्याला काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केली होती. तो घाबरला होता. आत्ता लोक मला सोडणार नाही या भितीपोटी तो पळून गेला होता. त्याच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा हा सात वर्षाच्या शिक्षे पेक्षा कमी आहे. त्याच्या घरच्या लोकांनी हे देखील आश्वासन दिले आहे. ज्या लोकांच्या पावत्या त्याच्याकडे आहे. त्यांचे पैसे परत करणार आहे. पोलिसांनी पूढील प्रक्रिया करुन त्याला सोडून दिले.