
डोंबिवली : कल्याण डोंबिवली रनर्स आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2025 या मॅरेथॉन स्पर्धेच्या यावर्षीचे थीमचे अनावरण भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाची डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन स्पर्धा 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धक नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा चव्हाण यांनी केली.
धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैली निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने चालणो, धावणो किंवा पळणो याबद्दल समाजात जागरूकता वाढावी आणि आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र रुजविण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. डोंबिवलीकर फेंड्रशिप रनमध्ये अनिल कोरवी, दिलीप घाडगे, हरिदासन नायर, धृती चौधरी, सुजाता साहू, गगन खत्री हे विख्यात धावपटू सहभागी होणार आहेत. यासोबतच अंबरनाथ रनर्स फाऊं डेशन, बोरगावकर मॅरेथॉन कल्याण, चॅम्पियन्स स्पोर्ट्स अॅड अॅडव्हेंचर्स , कल्याण रनर्स, मुंब्रा रनर्स, पलावा रनर्स, पियुष फाउंडेशन, उल्हासनगर, रनर्स क्लॅन फाउंडेशन, रनहोलिक्स, रनटास्टिक दिल से, शिवरत्न अकादमी या संस्थांशी निगडित धावपटू देखील डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमध्ये सहभागी होणार आहेत.
दरम्यान मागील वर्षी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन स्पर्धेत साडेतीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. यंदा पाच हजारांहून अधिक स्पर्धेक भाग घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. डोंबिवलीकर फेंड्रशिप रनमध्ये हौशी आणि व्यवासायिक स्पर्धक भाग घेणार असून यंदा ही सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, सुमारे तीन लाख रुपयांची बक्षिसे, विविध वयोगटात स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमाची घोषणा आयोजकांनी केली. ‘डोंबिवलीकर फेंड्रशिप रन 2025 ही स्पर्धा 21.1 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1.6 किमीचा फन रन या टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
कल्याण डोंबिवली रनर ग्रुप पाचशे मॅरेथॉनर्स असलेली संस्था गेली दहा वर्ष डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. डोंबिवली हे सांस्कृतिक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरूस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे मत रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण फन रन
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण 1.6 किमी चा फन रन असणार आहे. जेथे आठ वर्षापासून ते वृध्दांर्पयत सर्वाचा सहभाग असणार आहे. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारातर्फे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहान क