बांग्लादेशातील न्यायाधीश नियुक्त्यांवर अल्पसंख्याक समुदायांची नाराजी

    29-Aug-2025   
Total Views |

मुंबई : बांग्लादेश हिंदू बौद्ध ईसाई एकता परिषदेने देशातील नव्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायांचा सहभाग न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बांग्लादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हायकोर्ट विभागात २५ अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये ९ न्यायिक अधिकारी, ९ वकील आणि ७ विधी अधिकारी आहेत.

यासंदर्भात परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या नियुक्त्यांमध्ये धार्मिक व जातीय अल्पसंख्याक समुदायातील एकाही व्यक्तीचा समावेश नसणे ही अतिशय खेदजनक बाब आहे. देशाच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांचा वाटा सुमारे दहा टक्के असतानाही नितुक्त २५ न्यायाधीशांमध्ये त्यांचा शून्य सहभाग निश्चितच चिंताजनक आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, बांग्लादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मुख्य न्यायाधीश सय्यद रेफात अहमद यांच्या सल्ल्याने या नियुक्त्या केल्या, ज्यामुळे हायकोर्ट न्यायाधीशांची संख्या ११३ झाली. त्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी नव्या २५ न्यायाधीशांना शपथ दिली.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक