स्विडनमधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष ; हिंदू बांधवांकडून महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

    28-Aug-2025   
Total Views |

मुंबई : स्विडनमधील हिंदू समाज यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे दहावे वर्ष साजरा करीत आहे. १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरु केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरेचा वारसा पुढे नेत स्विडनमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात २०१६ मध्ये झाली आणि आज हा उत्सव दक्षिण-पश्चिम इंग्लंड व वेल्समधील एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ठरला आहे.

यंदाच्या उत्सवाला सोमवार, २५ ऑगस्ट रोजी भगवान गणेशांच्या आगमन मिरवणुकीने सुरुवात झाली. मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी मूर्ती स्थापना मुहूर्तानुसार पार पडली. त्यानंतर षोडशोपचार पूजा व महाआरती झाली. संध्याकाळी पुन्हा महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लंडनस्थित भारतीय दूतावासाचे समन्वय मंत्री दीपक चौधरी उपस्थित होते. त्यांनी कलाकारांचे अभिनंदन करून त्यांच्या आध्यात्मिकता जपणाऱ्या सुंदर सादरीकरणांचे कौतुक केले. तसेच, यूकेमध्ये ही परंपरा जपल्याबद्दल समुदायाचे अभिनंदन केले. स्विंडन गणेशोत्सव २०२५ चे संरक्षक व प्रायोजक यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा प्रितिभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मूर्ती स्थापनेनंतर मंदिर भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले असून संपूर्ण उत्सवकाळात सर्वांना दर्शन आणि आशीर्वाद घेण्याची संधी मिळत आहे. स्विडन हिंदू मंदिराचे अध्यक्ष प्रदीप भारद्वाज यांनी सांगितले की, “स्विडन गणेशोत्सव हा फक्त आमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण दक्षिण-पश्चिम इंग्लंड व वेल्स प्रदेशासाठी एक महत्त्वाचा उत्सव आहे. हा सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो.” स्विडन गणेशोत्सवचे संस्थापक आणि स्विडन मित्र मंडळचे अध्यक्ष आशीष चन्नावर यावेळी म्हणाले, यंदा दहावे वर्ष असल्यामुळे हा उत्सव आणखी खास झाला आहे. दरवर्षी हा उत्सव भगवान गणेशाच्या जन्माचे स्मरण करून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणतो. तो आपल्या समाजात आनंद, ऐक्य आणि भक्ती पसरवतो. यावर्षीच्या उत्सवात एक विलक्षण आणि दुर्मिळ दैवी चिन्ह दिसले.

स्विडन सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश श्रद्धा, संस्कृती आणि सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणे हा असून, हा उत्सव पिढ्यान्पिढ्या नाती अधिक दृढ करीत आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक