धर्माच्या रक्षणासाठी शीख गुरुंचे बलिदान आजही देशाच्या अंतर्मनात जिवंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई  : शीख गुरुंनी सनातन धर्म व भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य, त्याग व बलिदान आजही देशाच्या अंतर्मनात जिवंत आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. गोरखपुर येथील गुरुद्वारा श्रीगुरु सिंह सभेत आयोजित पर्यटन विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, शीख गुरूंची परंपरा अटळ आहे. गुरु नानक देवांपासून गुरु गोविंद सिंहांपर्यंत प्रत्येक गुरुंनी सनातन धर्म व राष्ट्राच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. जेव्हा केव्हाही भारतीय संस्कृतीवर संकट आले, तेव्हा शीख गुरु पुढे सरसावून आपल्या बलिदानाने तिचे रक्षण केले.

चार साहिबजाद्यांचे बलिदान भारतीय इतिहासातील गौरवशाली अध्याय असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले, बाबा अजीत सिंह, बाबा जुझार सिंह, बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांचे बलिदान भारतीय इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे. त्यांना लोभ दाखवण्यात आला होता की, इस्लाम स्वीकारला तर जीवन व राजसत्ता सुरक्षित राहील, परंतु त्यांनी झुकण्याऐवजी बलिदानाचा मार्ग निवडला. लहान साहिबजाद्यांना भिंतीत जिवंत बंद करून शहीद करण्यात आले, पण त्यांनी आपल्या धर्म व राष्ट्राच्या रक्षणासाठी अढळ निष्ठा दाखवली. हे बलिदान आज आपण सर्वांना प्रेरणा देते.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक