महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागातर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई, मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषा दर्जाच्या पार्श्वभूमीवर अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुले असेल. प्रत्येक स्पर्धकला 'अभिजात मराठी - माझ्या अपेक्षा' या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनीटे व्यक्त व्हावे सदर वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील १०० सर्वोत्त्म स्पर्धकांची मराठी भाषा दूत म्हणून निवड होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या संकेतस्थळावर स्पर्धकांनी नोंदणी करावी असे आवाहन मराठी भाषा विभागच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.