गणोश विसजर्नाच्या या चार दिवशी माणकोली पूलावर वाहतूकीला बंदी - डीसीपी पंकज शिरसाट यांच्याकडून अधिसूचना जारी

    22-Aug-2025   
Total Views |

डोंबिवली, केडीएमसीच्या हद्दीतील रेतीबंदर मोठागाव पूलाखाली असलेली रेतीबंदर खाडी येथे गणपती विसजर्न क रण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येत असतात. त्यामुळे सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता गणोश विसजर्नाच्या त्या चार दिवसात माणकोली पूलावर वाहतूकीला बंदी घालण्यात आली आहे. त्या संदर्भातील डीपीसी पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केली आहे. हा बदल चार दिवसांसाठी असून अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणपती विसजर्नार्पयत राहणार आहे.

डोंबिवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालवधीत गणोशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे. त्यात २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या कालवधीत गणपती विसजर्न करण्यात येणार आहे. गणपती आणि गौरी विसजर्नासाठी भाविक येथे मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी याकरिता वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. ही अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.

असा असेल बदल

ठाणो आणि मुंबई येथून माणकोली-मोठागाव पूलावरून मोठागाव डोंबिवली पश्चिम येथे येणारी वाहतूक नारपोली वाहतूक उपविभाग हद्दीत मानकोली भिवंडी हायवे, अंजुर दिवेगाव, लोढा धाम येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नारपोली वाहतूक उपविभाग यांच्या हद्दीत अंजूरफाटा , राजनोली भिवंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

कल्याण ,अंबरनाथ, बदलापूर व नवी मुंबई येथून मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिवंडीकडे जाणा:या वाहनांना कोळसेवाडी वाहतूक उपविभाग हद्दीत पत्रीपूल, टाटा नाका, सुयोग हॉटेल, डीएनएस बॅकेजवळ, सोनारपाडा, मानपाडा पेट्रोलपंपाजवळ, मानपाडा चौक, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीतून दुर्गाडी चौक कल्याण मार्गे इच्छितस्थळी जातील.

ठाकुर्ली पूर्व व डोंबिवली पूर्व कडून मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिवंडीकडे जाणा:या वाहनांना कोपर ब्रिज व ठाकुर्ली ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी कल्याण वाहतूक उपविभागाचे हद्दीतून दुर्गाडी चौक कल्याण मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

डोंबिवली पश्चिमेक डून मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिवंडीकडे जाणा:या वाहनांना मोठागाव ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी कल्याण वाहतूक उपविभागाचे हद्दीतून दुर्गाडी चौक, कल्याण मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.