कीर्ती महाविद्यालयात रंगला भारतीय ज्ञानविश्वाचा जागर!

    22-Aug-2025   
Total Views |

मुंबई : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम. डुंगूरसी महाविद्यालयात दि. १४ ऑगस्ट रोजी भारतीय ज्ञान प्रणाली दिन अर्थात आय. के. एस. डे अत्यंत उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आय. आय टी मुंबईचे अभियंता चैतन्य पडाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मागच्या वर्षी पासून कीर्ती महाविद्यालयात भारतीय ज्ञान प्रणाली दिन साजरा केला जात आहे, या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, संशोधकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे.


डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कीर्ती एम. डूंगर्सी महाविद्यालय , जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल आणि नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मार्कंडे सर , एन.एम.आय.टी.डीच्या संचालिका रसिका माल्या ज.एस.के.बीच्या प्रभारी संचालिका गरिबाला देवस्थळी,, कीर्ती महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. मीनल मापुस्कर, उपप्राचार्य अपूर्वा यादव मॅडम यांच्या सहकार्याने आणि आय.के.एस समन्वयक जान्हवी कोलते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. "प्राचीन भारत" हा विषय केंद्रस्थानी ठेवून, भारतीय शिक्षण प्रणालीमधील गुरुकुल परंपरा, निसर्गासोबत असलेलं या शिक्षणव्यवस्थेचे नातं आदी गोष्टींवर या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. त्याचबरोबर आधुनिक काळात भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास नृत्याच्या माध्यामतून विद्यार्थ्यांनी सादर केला. या कार्यक्रमात संस्कृत भाषेचे महत्व पटवून देणारे ’एक छोटा प्रवेश’ (नाटक) सादर करण्यात आले.


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.